नव्या संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात कायम असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा कोरोनाच्या उद्रेकामुळे मोठा तुटवडा जाणवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे निवासस्थान आणि नवीन संसद भवनाचे काम देशात बिकट परिस्थिती असतानाही जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात हे काम थांबवावे, अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली आहे.

कोरोनाने थैमान देशात थैमान घातलेले असतानाच दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे निवास्थान, एकाच ठिकाणी सर्व मंत्रालये, उपराष्ट्रपती निवास, एसपीजी मुख्यालय अशा सगळ्या इमारती या सेंट्रल विस्टा अंतर्गत उभारण्यात येणार आहेत.हे काम कोरोनाचा कहर कायम असल्यामुळे थांबवण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली
आहे. पण, कोरोना कर्फ्यू लागण्यापूर्वी हे काम सुरू झाल्याचे केंद्र सरकाने सांगितले आहे. त्याचबरोबर सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या कामाचे केंद्र सरकारकडून समर्थन करण्यात आले आहे.

कोरोना कर्फ्यू लागू होण्यापूर्वीच हे काम सुरू झाले आहे. तसेच या कामासाठी काम असलेले मजूर यांची योग्य काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे कामाच्या ठिकाणी आणि मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी पालन केले जात आहे. त्याचबरोबर मजुरांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. काम थांबवण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका खोट्या दाव्यांवर करण्यात आली असून, ही याचिका न्यायालयाने फेटाळावी, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सुनावणीवेळी सांगितले.

सेंट्रल विस्टाचे काम थांबवण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली होती. पण यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. देशात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर संसदेची नवी इमारत आणि सेंट्रल व्हिस्टा हे दोन प्रकल्प मोदींच्या अजेंड्यावर होते. अगदी कोरोनाच्या काळातही सेंट्रल विस्टासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सरकारने किमान या काळात तरी प्राथमिकता बदलायला हवी होती, अशी टीका विरोधक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा