कल्याणमधील पेट्रोल पंप पाण्याखाली ; 100 लोक अडकल्याची भीती

मुंबईसह महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण याठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. उल्हास नदीला पाणी पातळीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

याच पावसामुळे कल्याणमधील एका पेट्रोल पंप पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी 100 लोक अडकल्याची समोर आली आहे. या पेट्रोल पंपावरील गाड्याही पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. दरम्यान या ठिकाणच्या रस्त्यात पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.दरम्यान या लोकांच्या बचावासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. तसेच आर्मी आणि एअर फोर्सची मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.