InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

उदयनराजेंच्या निषेधार्थ फलटणबंद

- Advertisement -

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा पुतळा जाळल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात घोषणाबाजी करुन फलटण बंदचे आवाहन केले. या बंदला फलटणकर नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.

पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून रामराजे नाईक निंबाळकर यांचा विजय असोच्या घोषणा देण्यात आल्या तसेच खासदार उदयनराजे भोसले यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, निरा-देवघरच्या पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात वादाने शनिवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंवर स्वयंघोषित छत्रपती म्हणून टीका केल्यानंतर उदयनराजे भोसले समर्थकांनी दुपारी पोवई नाक्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.