Pickel Side-effects | दररोज लोणच्याचे सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Pickel Side-effects | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये बहुतांश लोकांना जेवणासोबत लोणच्याचे सेवन करायला आवडते. लोणच्यामुळे जेवणाची चव दुप्पट होते. त्यामुळे अनेकजण दररोज लोणच्याचे सेवन करतात. मात्र, दररोज लोणचे खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रोज लोणचं खाल्ल्याने उच्च रक्तदाब, गॅस, ऍसिडिटी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण लोणच्यामध्ये मीठ, मसाले आणि तेलाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दररोज लोणच्याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दररोज लोणचं खाल्ल्याने आरोग्याला खालील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

उच्च रक्तदाब (High blood pressure-Pickel Side-effects)

लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लोणच्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे तुम्ही जर हाय बीपीचे रुग्ण असाल, तर तुम्ही लोणच्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही प्रमाणामध्ये लोणच्याचे सेवन केले पाहिजे.

गॅस आणि ऍसिडिटी (Gas and acidity-Pickel Side-effects)

लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात मसाला वापरला जातो. त्यामुळे लोणच्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही जर दररोज लोणच्याचे सेवन करत असाल, तर तुम्हाला गॅस, एसिडिटी, अपचन इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कोलेस्ट्रॉल वाढू शकते (Cholesterol may increase-Pickel Side-effects)

जास्त प्रमाणात लोणच्याचे सेवन केल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होऊ शकते. लोणच्याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये भरपूर तेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत लोणच्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल पातळी वाढू शकते. परिणामी हृदयविकाराचा धोका वाढतो.

उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात लोणच्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणात खरबुजाच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

शरीर हायड्रेट राहते (The body stays hydrated-Muskmelon Juice Benefits)

उन्हाळ्यामध्ये अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि डीहायड्रेशनची समस्या निर्माण होते. डीहायडरेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खरबुजाच्या रसाचे सेवन करू शकतात. खरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. खरबुजाचा ज्यूस प्यायल्याने या गरम वातावरणात शरीर थंड राहू शकते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Muskmelon Juice Benefits)

निरोगी राहण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही खरबुजाच्या रसाचे सेवन करू शकतात. खरबुजामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. खरबुजाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही सर्दी-खोकला इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या