Piles | ‘या’ फळांचे सेवन केल्याने मूळव्याध राहू शकतो नियंत्रणात

Piles | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल मूळव्याधची (Piles) समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अनियमित आहार आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक या आजाराचे शिकार होत आहेत. भारतामध्ये मुळव्याध रुग्णांची संख्या जवळपास एक कोटीच्या आसपास आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. मुळव्याध नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही बदल करू शकतात. मुळव्याध नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही पुढील फळांचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात.

पुढील फळांचे सेवन केल्याने मूळव्याध (Piles) राहू शकतो नियंत्रणात

सफरचंद

सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दररोज एक सफरचंद खाऊन आपण डॉक्टरांपासून दूर राहू शकतो, असे देखील म्हणतात. त्याचबरोबर नियमित सफरचंद खाल्ल्याने मूळव्याध नियंत्रणात राहू शकतो. त्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली होते. त्याचबरोबर यामध्ये पेक्टीन फायबर आढळते, जे आतडे निरोगी ठेवते. नियमित सफरचंदाचे सेवन केल्याने मूळव्याध नियंत्रणात राहू शकतो.

रताळे आणि केळी

मुळव्याध नियंत्रणात ठेवण्यासाठी रताळे आणि केळी उपयुक्त ठरू शकतात. कारण या फळांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि विटामिन्स उपलब्ध असतात. त्यामुळे या फळांचे नियमित सेवन केल्याने मूळव्याध सहज नियंत्रणात राहू शकतो. या फळांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई आणि पोटॅशियम वाढवण्यात येते. या गुणधर्मांच्या मदतीने मूळव्याध नियंत्रणात राहू शकतो.

पपई

पपईचे नियमित सेवन केल्याने मूळव्याध नियंत्रणात राहू शकतो. कारण याच्या सेवनाने मूळव्याधामुळे होणारा रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो. पपईमध्ये माफक प्रमाणात फायबर आढळून येते. त्यामुळे पपई खाल्ल्याने मुळव्याधावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

हिवाळ्यामध्ये या फळांचे सेवन केल्याने मूळव्याधच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. कारण या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते. बरोबर या फळांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि विटामिन आढळून येतात. त्यामुळे नियमित या फळांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारून मूळव्याध नियंत्रणात राहू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.