InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

चेहऱ्यावर पिंपल्स का येतात

हार्मोन्सचे असंतुलन, मलावरोध, अनियमित मासिक पाळी, जास्त मीठ, आंबट आणि मसालेदार जेवण ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. पिंपल्सला सतत स्पर्श केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची लस पसरते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही पिपंल्सची समस्या निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील. तर काकडीच्या गोल चकत्यांनी चेहऱ्याला मसाज केल्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. त्या व्यतिरिक्त दररोज चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ केल्यामुळे आराम मिळेल. हळद, मुलतानी माती, गुलाब जल आणि बेसन हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानं पिंपल्स रोखण्यास मदत होते.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.