InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

थोबाडीत मारल्याचा जाब विचारणार्‍या तरुणावर टोळक्याचा धारदार शस्त्राने वार

थोबाडीत मारल्याचा जाब विचारणार्‍या तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पिंपरीतील डिलक्स चौकात गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मंजीत मोतिलाल प्रसाद असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी मोहन संभाजी देवकाते यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मेश श्यामकांत पाटील, यशवंत ऊर्फ अनिल लक्ष्मण गायकवाड आणि स्वप्निल संजय कांबळे यांना अटक केली आहे. पोलिस आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply