InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करा – पंकजा मुंडे

जिल्ह्यातील परळी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा समाज बांधवांतर्फे ऋणनिर्देशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला हजर राहण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. त्यावेळी, हातात तलवार घेऊन घोड्यावरुन फेरफटकाही पंकजा मुंडेंनी मारला.

मराठा आरक्षण मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, हे मुंडेसाहेबांचा स्वप्न होतं. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळेल तरच ते टिकेल, असेही मुंडेसाहेबांनी म्हटल्याच पंकजा यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावेळी आपण एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली. आता, एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करायचंय, असेही पंकजा यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply