PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांना मिळवता येणार दरमहा 3000 रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या
टीम महाराष्ट्र देशा: सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या कामांमध्ये खूप मदत होते. या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन PM Kisan Mandhan Yojana योजनेचा समावेश आहे. या योजनेला किसान पेन्शन योजना Kisan Pension Yojana म्हणूनही ओळखले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक दृष्ट्या मदत केली जाते. या योजनेमध्ये देशातील लहान आणि श्रीमंत शेतकरी त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी रुपये 200 पर्यंत गुंतवणूक करू शकता. त्यानंतर शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षी 3000 रुपये दरमहा पेन्शन दिली जाईल. वय वर्ष 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये आतापर्यंत देशातील 19 लाख 23 हजार 475 शेतकरी सामील झाले आहेत.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना PM Kisan Mandhan Yojana
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा देशातील 18 ते 40 वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी लाभ मिळवू शकतात. याच शेतकऱ्यांचा लाभार्थी यादीमध्ये समावेश आहे. देशातील ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जमीन आहे तेच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतील. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अठरा वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना दरमहा 22 रुपये जमा करावे लागतील. तर, 30 वर्षाच्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम 110 रुपयापर्यंत वाढते. तर वयाच्या 40 व्या वर्षी किसान मानधन योजनेचा लाभ केल्यावर दरमहा 200 रुपये जमा करावे लागेल. यानंतर शेतकऱ्यांना सरकारकडून साठ वर्षानंतर दरमहा 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन दिली जाईल.
या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?
पीएम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत दोन एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. तर पीएम किसान मानधन योजनेत देखील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना वयवर्ष 60 नंतर पेन्शन दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना PM किसान मानधन योजनेच्या अधिकृत पोर्टल https://pmkmy.gov.in/ ला जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन अर्ज करू शकता.
पीएम किसान मानधन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. यामध्ये शेतकऱ्याजवळ स्वतःचे आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
PM Kisan Mandhan Yojana बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी 1800 267 6888 किंवा 14434 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून मदत मिळू शकतील.
महत्वाच्या बातम्या
- Ravichandran Ashwin। मोहम्मद नवाजचा चेंडू वाईड गेला नसता, तर मी निवृत्ती घेतली असती, अश्विनचे धक्कादायक विधान
- IND vs NED T20 World Cup | केएल राहुल बाद नव्हता! रोहित स्वार्थी कर्णधार, सोशल मीडियावर टीका
- NTRO Job Alert | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये NTRO विविध पदांसाठी बंपर भरती
- Eknath Khadase | “…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी
- IND vs NED T20 World Cup | भारताला पहिला झटका! केएल राहुल बाद
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.