PM Kisan Yojana | नवीन वर्षातील ‘या’ महिन्यात मिळेल शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 13 वा हप्ता
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात. या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडेच या यादीतून 1.86 कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढून टाकण्यात आले आहे. कारण या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धती वापरून या योजनेच्या लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करणे सरकारने अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या या गोष्टी पूर्ण नसतील, त्यांना या योजनेच्या तेराव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल. प्रधानमंत्री किसान योजनेचा तेरावा हप्ता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार, फक्त दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या लहान शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळेल. त्याचबरोबर या शेतकऱ्यांकडे भारताचे नागरिकत्व असणे बंधनकारक आहे. ही योजना गरीब आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी तयार केलेली आहे. शेतकरी या योजनेसंबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
प्रधानमंत्री योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.
महत्वाच्या बातम्या
- Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केसांना कोमट तेल लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे
- IND vs SL | बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व
- Winter Session 2022 | “दरमहा २० हजार निवृत्ती वेतन…” ; सीमा भागातील मराठी नागरिकांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
- Winter Session 2022 | सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठरावात नेमकं काय? वाचा एका क्लिकवर…
- Ajit Pawar | …तर मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन ; अजित पवारांचा भाजपला इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.