PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यात ‘या’ शेतकऱ्यांना मिळू शकतात 4000 रुपये

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचे (Pradhan Mantri Nidhi Samman Yojana) 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहे. शेतकरी आता या योजनेतील चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. या योजनेतील बाराव्या हप्त्यापासून केंद्र सरकारने काही कडक नियम जारी केले आहेत. कारण काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्राच्या मदतीने या योजनेतील रकमेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून केंद्र सरकार वसुली करत आहे. त्याचबरोबर 14 वा हप्ता कधी मिळणार याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत अपडेट देण्यात आलेली नाही. मात्र, चौदाव्या हप्त्यामध्ये काही शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये रक्कम मिळू शकते.

‘या’ शेतकऱ्यांना मिळू शकतात 4000 रुपये (‘These’ farmers can get Rs 4000)

देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तेराव्या हप्त्याची (PM Kisan Yojana) रक्कम पाठवण्यात आली आहे. तर लाखो शेतकऱ्यांना या योजनेतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित रहावे लागले आहे. चौदाव्या हप्त्यापूर्वी या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून घेतली तर त्यांना तेराव्या आणि चौदाव्या दोन्ही हप्त्याची रक्कम (4000 रुपये) एकत्र मिळू शकते.

या योजनेतील (PM Kisan Yojana) चौदावा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी आणि कागदपत्रांची पडताळणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टी पूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्याचबरोबर ही रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड पडताळणी करून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही कामं उरकून घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.

PM किसान योजना हेल्पलाईन (PM Kisan Yojana Helpline)

पीएम किसान योजनेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येत असेल, तर तुम्ही सरकारची मदत घेऊ शकतात. यासाठी तुम्ही या pmkisan-ict@gov.in ईमेल आयडीवर तुमची अडचण नोंदवू शकतात. किंवा या 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.