PM Kisan Yojana | शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपणार, पीएम किसान योजनेचा 12 हफ्ता आज होणार जमा
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सगळीकडे दिवाळीची चाहूल लागली आहे. दरम्यान,सर्व क्षेत्रातील एम्पलोयी आपल्या बोनसची वाट बघत असतात. त्याचप्रमाणे शेतकरी देखील आपल्या पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तब्बल 10 कोटींहून अधिक शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी हा हप्ता ऑगस्ट महिन्यात आला होता तर या वर्षी ऑक्टोबर महिना आला तरी अजून हा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही. ताज्या अपडेटनुसार, आज शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता पाठवला जाऊ शकतो. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झाले आहे त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना आज मिळणार पीएम योजनेचा ( PM Kisan Yojana ) 12 वा हप्ता
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 14000 शेतकरी आणि 1500 कृषी स्टार्टअप सहभागी झाले होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा 12 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 16000 कोटी रुपये क्षणार्धात पोहोचणार आहेत.
का सुरू झाली होती पीएम किसान योजना ( PM Kisan Yojana ) ?
देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती. शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न, मालमत्ता इत्यादी गोष्टी तपासून त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यानंतर कृषी विभागात शेतकऱ्यांचे बँक खाते आणि इतर माहिती जमा केली जाते. ही तपासणी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षातून तीनदा( 4 महिन्यातून एकदा) 2 हजार रुपये पाठवले जातात.
अधिक माहितीसाठी संपर्क
शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याबाबत काही शंका किंवा तक्रार असल्यास शेतकरी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर किंवा टोल फ्री नंबर वर संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकतात. त्याचबरोबर शेतकरी आपली तक्रार ईमेल आयडी द्वारे सुद्धा मेल करू शकतात.
हेल्पलाइन नंबर – 155261
टोल फ्री नंबर – 1800115526
ई मेल – pmkisan-ict@gov.in
महत्वाच्या बातम्या
- Shivsena । “गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे”; ठाकरे गटाचा इशारा
- Maharashtra Rain Update | राज्यात मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता
- Ajit Pawar | अजित पवार अडचणीत येणार! ‘या’ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून होणार चौकशी
- Sachin Sawant | “राज ठाकरेंना महाराज कळले असते तर…”; काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला
- Gulabrao Patil | “अन्याय होत असेल तर…”, गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंवर पलटवार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.