PM Kisan Yojana | शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ महिन्यामध्ये येणार पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Sanman Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. या योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहे. केंद्र सरकार आता 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्याच्या तयारीत व्यस्त आहे.
‘या’ महिन्यामध्ये येणार 14 वा हप्ता (14th installment coming in ‘this’ month)
प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) 13 व्या हप्त्याचा देशातील तब्बल 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. शेतकरी आता 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मे किंवा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील 14 व्या हप्त्याची रक्कम पोहोचणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रांची मदत घेतली होती. त्यामुळे या योजनेमध्ये केंद्र सरकारने काही कडक नियम जारी केले आहे. जमिनीची पडताळणी, आधार कार्ड व्हेरिफिकेशन आणि केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचे या यादीतून नाव कापले जात आहे. वरील सर्व गोष्टी पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही कामं पूर्ण करावी, असे आवाहन सरकारकडून सातत्याने केले जात आहे.
PM किसान योजना हेल्पलाईन (PM Kisan Yojana Helpline)
पीएम किसान योजनेमध्ये (PM Kisan Yojana) तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येत असेल, तर तुम्ही सरकारची मदत घेऊ शकतात. यासाठी तुम्ही या pmkisan-ict@gov.in ईमेल आयडीवर तुमची अडचण नोंदवू शकतात. किंवा या 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Honey Benefits | उन्हाळ्यामध्ये करा मधाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | ‘या’ ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, तर ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज
- Ajit Pawar | सरकारला कुणी रोखलं? ‘त्या’ घटनेवरून अजित पवारांनी उपस्थित केला प्रश्न
- Ajit Pawar | संजय राऊतांना कोणी अधिकार दिला? अजित पवारांनी राऊतांचे कान टोचले
Comments are closed.