PM Kisan Yojana | सरकारची कडक सूचना! 31 डिसेंबरच्या आधी शेतकऱ्यांनी पूर्ण करा ‘हे’ काम
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. आता शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने थोडे कडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. 2018 सुरू झालेल्या योजनेचा आतापर्यंत तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पात्रता आणि नियमांच्या विरोधात जाऊन काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेतील बाराव्या हप्त्याची रक्कम मिळवली आहे. त्यामुळे या योजनेतील तेरावा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही कडक नियम योजले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत या गोष्टी करण्याची मुदत दिली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ही कामे लवकरात लवकर करून घ्यावी अशी सरकारकडून सातत्याने सांगितल्या जात आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करू शकतात. यासाठी शेतकरी जवळही कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून पीएम फॉर्मचा अर्ज मिळू शकतात. दरम्यान, या अर्जामध्ये सांगितलेली सगळी माहिती योग्य पद्धतीने भरून योग्य कागदपत्रांची प्रत या सोबत जोडणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या कागदपत्रांसोबत रेशन कार्ड क्रमांक द्यायला विसरू नका. कारण सरकारने जारी केलेले नव्या नियमानुसार रेशन कार्ड क्रमांक शिवाय तुम्हाला 13 वा हप्ता मिळणार नाही.
पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) हेल्पलाइन नंबर
प्रधानमंत्री योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करून करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांची सभागृहात मागणी
- R Ashwin | ‘ही’ कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन ठरला जगातील दुसराच खेळाडू
- Hritik Roshan | गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसोबत ऋतिक रोशनचे सुट्टीचे फोटो व्हायरल
- Uddhav Thackeray | “मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देणार…” ; उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी
- Winter Session 2022 | सीमावादाचा ठराव सभागृहात का मांडला जात नाही?, अजित पवार संतापले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.