PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. आता शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने थोडे कडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. 2018 सुरू झालेल्या योजनेचा आतापर्यंत तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा 13 वा हप्ता वेळेवर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार मकर संक्रांतीच्या आधी तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. म्हणजेच येथे आठवड्याभरात शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार फक्त दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या लहान शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा मिळेल. त्याचबरोबर या शेतकऱ्यांकडे भारताचे नागरिकत्व असणे बंधनकारक आहे. ही योजना गरीब आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी तयार केलेली आहे. शेतकरी या योजनेसंबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
प्रधानमंत्री योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करून करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs SL | अर्षदीपच्या खराब गोलंदाजीवर इरफान पठाणचे ट्विट, म्हणाला…
- Hair Care Tips | केसांची निगा राखण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Rishabh Pant | ऋषभ पंतला भेटायला गेली उर्वशी रौतेला? ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण
- Weather Update | राज्यात ‘या’ भागात ढगाळ वातावरण, तर ‘या’ जिल्ह्यात वाढली थंडी
- Suhana Khan | किंग खानची लेक करतेय बिग बींच्या नातवाला डेट?