PM Kisan Yojana | PM Kisan योजनेमध्ये सरकारने केला मोठा बदल, नक्की काय आहे? जाणून घ्या
टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकरी सध्या PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 16000 कोटी रुपये क्षणार्धात पोहोचले आहेत. पण अद्यापही देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम योजनेचे 2000 रुपये पोहोचले नाहीत. दरम्यान काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की वेबसाईटवर त्यांना त्यांच्या पीएम योजनेच्या 12 व्या हप्त्याची स्थिती तपासता येत नाही. कारण नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या 12 व्या हप्त्याची स्थिती तपासता येत नाही.
पीएम योजनेअंतर्गत 12 व्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ आता आधार नंबर पुरेसा नाही तर शेतकऱ्यांना आधार कार्डशी लिंक केलेला अधिकृत मोबाईल नंबर देखील प्रविष्ट करावा लागेल. जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यापासून वंचित रहावे लागेल. या समस्येसाठी शेतकऱ्यांनी लवकर केवायसी आणि भूमी आलेखातील पडताळणी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची स्थिती पुढीलप्रमाणे तपासावी
सरकारने काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी अनिवार्य केले होते. आता सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी स्थिती तपासण्याच्या प्रक्रियेसाठी मोठे बदल करण्यात आलेले आहे. पीएम किसान योजनेसाठी जोडलेले राहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मोबाईल क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. कारण आता पीएम किसान योजनेबद्दल कोणतीही माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या आधार नंबर बरोबर मोबाईल क्रमांक लागेल.
PM Kisan Yojana 12 व्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्याची नवीन प्रक्रिया
- पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत पोर्टलवर pmkisan.gov.in वर जावे लागेल.
- यानंतर उजव्या बाजूला लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पुढचे वेब पेज उघडतात शेतकऱ्याला त्याचा नोंदणी क्रमांक त्यामध्ये प्रविष्ट करावा लागेल.
- जर एखादा शेतकरी आपला नोंदणी क्रमांक विसरला असेल तर तुम्हाला ‘तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या’ या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून आलेला कॅपच्या कोड टाकावा लागेल.
- कॅपच्या कोड टाकल्यानंतर Get OTP या पर्यावर क्लिक करा.
- पी एम किसान योजनेच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर तुम्हाला एक OTP येईल तो आलेला OTP प्रविष्ट करा.
- यानंतर गेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या लाभार्थीची माहिती मिळेल.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “आनंदाचा शिधा वर, पैठणचा मिंधा…”, उद्धव ठाकरे गटाचा संदीपान भुमरेंच्या प्रतिमेवरुन खोचक टोला
- Devendra Fadanvis | मुंबई महापालिकेवर आपलाच भगवा फडकेल ; राज ठाकरेंच्या समोरच देवेंद्र फडणवीसांची घोषणा
- Government Job Alert | राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Maharashtra Rain Update | राज्यात परतीच्या पावसात धूम, तर मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान
- NCP | “…तर तलवारीने हात छाटण्याशिवाय राहणार नाही”, राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.