मालाड दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान मोदींनी जाहीर केली २ लाखांची मदत

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाडच्या पश्चिमेला असलेल्या मालवणी भागात चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन विचारपूस केली आहे. तसेच, शासनातर्फे मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना ५ लाखांची मदतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

राज्य सरकारच्या पाठोपाठे केंद्रातूनही मालाड इमारत दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे अनुदान तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मालाडच्या दुर्घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करत हळहळ व्यक्त केली आहे. मोदी म्हणाले आहेत की, ‘मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत दुर्घटनेतील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो’.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा