पंतप्रधान नरेंद्र मोदी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या गुजरातला जाणार

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभुतपुर्व यशानंतर आता पंतप्रधान उद्या आईचा आशिर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.

तसेच आईची भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या जनतेचे आभार  मानण्यासाठी परवा काशीला जाणार आहेत.

नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, ‘आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी परवा सकाळी काशीला जाणार आहे.’

तसेच, नरेंद्र मोदी हे 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.