InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लोकं मला विचारतात, आज राफेल असतं तर काय झालं असतं?- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली येथे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राफेल मुद्दावरून विरोधकांवर जोरदार टिका केली. राफेल मुद्दावर मोदी म्हणाले की, स्वार्थी राजकारणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. राफेलची कमतरता आज देशाला जाणवत आहे.

जनता मला विचारत आहे की, आज जर राफेल असतं तर काय झालं असतं. भारताकडे राफेल विमाने असती, तर देशाने बरीच मोठी कामगिरी केली असती. अख्खं जग दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारताच्या पाठीमागे आहे; पण देशातील काही लोक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे ही मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply