InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

वर्ध्याच्या सभेआधी नरेंद्र मोदी यांनी केले मराठीतून ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहे. नरेंद्र मोदी यांची पहिली सभा ही वर्धा येथे होणार आहे. याच पार्श्वभुमीवर मोदींनी मराठीत ट्विट केले आहे.ट्विटमध्ये वर्ध्यामध्ये होणाऱ्या सभेबद्दल सांगितले. तसेच युतीबद्दल ही ट्विट केले.

पंतप्रधानांनी ट्विट केले की, “महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार, आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे”

मोदींनी युतीबद्दल देखील ट्विट करत, महाराष्ट्रातील जनता युतीला आशिर्वाद देतील असा विश्वास व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.