InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सरसंघचालक मोहन भागवतांची भेट

लोकसभा निवडणुकाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर पतप्रधान नरेंद्र मोदी आज  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याचे कळते.

२३ मे रोजी निकालानंतर एक्झिट पोल प्रमाणे परिस्थिती कायम राहिली तर काय संभाव्य पावले उचलावी याबाबत दोघांच्या भेटीत चर्चा होऊ शकते.

गेल्या काही वर्षांपासून मोदी संघाच्या मुख्यालयापासून दूर होते. चार वर्षात मोदी पहिल्यांदाच संघाच्या मुख्यालयावरचा जाणार आहेत. जर भाजपला बहुमत मिळाले नाही तर घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्यासाठी संघाकडून पंतप्रधानपदासाठी मोदींच्या जागी दुसऱ्या नेत्याच्या नावाचा प्रस्ताव मांडू शकते, अशी चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.