PM Narendra Modi | दाऊदच्या गुंडांनी रचला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट? मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज
PM Narendra Modi | मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची हत्या करण्याचा कट दाऊद इब्राहिम (Daud Ibrahim) यांच्या गुंडांनी रचला असल्याची शक्यता समोर येतं आहे. याबाबतचा धमकीचा मेसेजसुद्धा मुंबई पोलिसांना अज्ञात व्यक्तीने केला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडली आहे. तसेत या घटनेमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या क्रमांकावर आज सकाळी एक व्हॉटसअप मेसेज आला. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. याबद्दल तातडीने वाहतूक शाखेनं वरिष्ठ पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
कंट्रोल नंबरवर अनेक ऑडिओ क्लिपसही आल्या आहेत. त्यापैकी एका क्लिपमध्ये मोदींना ठार मारण्याचा दावा केला आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे गुंड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार आहेत” आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं देखील ऑडीओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
21 तारखेला 12 ऑडिओ आणि 9 मेसेजेस प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 20 नोव्हेंबर रोजी ट्रॅफिक कंट्रोलच्या क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि 11 मेसेज प्राप्त झाल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs NZ | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पावसामुळे येणार व्यत्यय?, जाणून घ्या हवामान अंदाज
- Eknath Khadse | गिरीश महाजनांच्या विधानानंतर खडसेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “गेस्ट हाऊसवरील भानगड…”
- Bholaa Teaser Release | अजय देवगनच्या ‘भोला’ या चित्रपटाचा धमाकेदार टिझर रिलीज
- Kirit Somaiyaa | कोणता रिसाॅर्ट होणार जमीनदोस्त?, किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीला
- Sanjay Raut | भगतसिंग कोश्यारींना आम्ही राज्यपाल म्हणून स्वीकारायला तयार नाही, ते भाजपचे प्रचारक – संजय राऊत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.