PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, मोदींनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

PM Narendra Modi | अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांचं आज निधन झालं आहे. मोदींनी ट्विटरवर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. हिराबेन अहमदाबाद येथील रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांनी जून महिन्यामध्ये वयाची शंभरी गाठली होती. 28 डिसेंबर रोजी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईची भेट घेण्यासाठी अहमदाबादला गेले होते. आज मध्यरात्री हिराबेन मोदी यांनी अखेरचे श्वास मोजले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत आईच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी हिराबेन यांचा हातामध्ये दिवा असलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झाले.” मोदींनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आईमध्ये मला एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा, असं देखील मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आई हिराबेन यांची भेट घेतली होती. मोदी आणि त्यांच्या आईच्या भेटीचे फोटो समोर आले होते. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसले होते.

18 जून 2022 रोजी हिराबेन यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती. आईच्या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आईला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरात दौऱ्यावर असताना हिराबेन यांना भेटले होते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.