InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

2019 च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लढणार ‘या’ मतदार संघातून

भाजप संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी मतदार संघ निश्चित करण्यात आला आहे. 2014 च्या लोकसभेप्रमाणेच यावेळेस देखील,  नरेंद्र मोदी हे उत्तरप्रदेशमधील वाराणसी या मतदार संघातून लढणार आहेत.  नरेंद्र मोदी दोन मतदार संघातून निवडणूक लढवणार असून, दुसरा मतदार संघ अजून निश्चित झालेला नाही.

2014 च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनी वाराणसी बरोबरच गुजरातमधील बडोदा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. व दोन्ही मतदार संघामध्ये त्यांचा विजय झाला होता.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असून, मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.