InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका,साफसफाईचा विडिओ वायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची चेन्नईतील भेट सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. चेन्नईच्या समुद्रकिनारी असणाऱ्या महाबलीपुरम या शहरात हे दोन्ही थांबले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. ते साधारण अर्धा तास याठिकाणी होते. यावेळी मोदी किनाऱ्यावरील प्लॅस्टिक आणि कचरा उचलताना दिसले. मोदींनी हा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

किनाऱ्यावर जमवलेल्या गोष्टी (कलेक्शन) आपण हॉटेलमधील अधिकाऱ्याकडे सोपवल्याची मिष्किल टिप्पणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या या स्वच्छता अभियानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.