‘ईडी’चा गैरवापर हेच पंतप्रधानांचे नवे योगदान’

“आम्ही हे केले, पुन्हा सत्ता आल्यास हे करू, असे सांगण्यासारखे सत्ताधाऱ्यांकडे काहीही नाही. त्यामुळेच तर मुख्यमंत्री माझ्या नावाचा सतत जप करीत आहेत. ते कमी पडले म्हणून की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माझा जप करायला लावला. विरोधकांना धमकावत दोन वर्षांपासून नावारूपास आणलेल्या सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करणे, हेच पंतप्रधानांचे नवीन योगदान असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. सतत आमचेच नाव घेणे, याचा अर्थ आमचं मस्त चाललंय, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

“मनसे’ आम्हाला हवी; मात्र कॉंग्रेसला नको आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडीसोबत एकवाक्‍यता होत आहे. या सर्वांची स्वतंत्र शक्तिकेंद्रे असून महाआघाडीची ताकद दिसून येईल.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी “पुलवामा’चा लाभ घेतला. देशाच्या सुरक्षेसंबंधी फार काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. पुलवामासारख्या घटना घडल्या की घडवल्या माहिती नाही; मात्र त्याचा लोकसभेत त्यांनी लाभ करून घेतला.
सभागृहात 22 मंत्र्यांच्या घोटाळ्यांचे पुरावे दिल्यानंतर किमान त्याची चौकशी करतो किंवा न्यायमूर्तींमार्फत चौकशी करू, असा साधा चकार शब्द तरी काढण्याचे तारतम्य सत्ताधारी दाखवू शकले नाहीत. असेही पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.