Poco Mobile | भारतामध्ये लवकरच लाँच होऊ शकतो Poco चा ‘हा’ मोबाईल

Poco Mobile | टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षाच्या सुरुवातीला फक्त काही दिवस बाकी आहे. अशा अनेक मोबाईल (Mobile) उत्पादक कंपन्या आपले स्मार्टफोन लाँच करण्यात व्यस्त आहे. तर, अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी नवीन मोबाईल लॉंच करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत पोको (Poco) देखील नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी Poco C50 हा मोबाईल लाँच करणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची अधिकृत लाँच तारीख अद्याप घोषित केलेली नाही.

पोकोने आपल्या ट्विटर अकाउंटवर Poco C50 या स्मार्टफोनचा टीजर प्रदर्शित केला आहे. या टीचरवरून असे लक्षात आले आहे की, कंपनी लवकरच या स्मार्टफोनची लॉन्चिंग तारीख घोषित करेल. मीडिया रिपोर्टनुसार, पोको हा मोबाईल 3 जानेवारी रोजी लाँच करू शकते.

टीजरमध्ये दाखवल्याप्रमाणे या फोनमध्ये 00 कॅमेरा दिसत आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असू शकतो. या नवीन स्मार्टफोनमध्ये मागे आणि समोर दोन्ही ठिकाणी ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे.

Poco C50 हा स्मार्टफोन पोकोच्या सीरीजचा एक भाग आहे. या सिरीजमध्ये Poco C31 आणि Poco 30 या मोबाईलचा समावेश आहे. Poco C50 हा या सिरीजचा तिसरा स्मार्टफोन असेल.

Poco C31 आणि Poco 30 या मोबाईलमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध असू शकते. Poco C50 या येणाऱ्या स्मार्टफोन मध्ये समान क्षमतेची बॅटरी उपलब्ध असू शकते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.