InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अन्नत्याग करणाऱ्या त्या मुलींवर पोलिसांची कारवाई; जबरदस्तीने रुग्णालयात हलवलं

पुणतांब्यात कृषीकन्या गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या तीनही मुलींची काल तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुलींची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी बळजबरीने मुलींच्या या आंदोलनावर कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईला आंदोलक मुलींनी आणि ग्रामस्थांनी विरोध केला. मुलींचा विरोध असतानाही महिला पोलिसांनी उचलून रुग्णवाहिकेत टाकले. उपोषणस्थळाचा मंडपदेखील उखडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे उपोषणाचा लवलेशही दिसत नाही. निकिता जाधव हिचे वडील धनंजय जाधव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर सरकारने आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.