पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं, आता आदित्य ठाकरेंकडून मिळालं मोठं बक्षीस!

मुंबई : नारायण राणे केंद्रात कॅबिनेट मंत्री झाल्यावर महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होत. या यंत्रे दरम्यान नवनिर्वाचित मंत्री लोकांशी संवाद साधणार होते. सध्या राणेंची जन आशीर्वाद यात्रा कोकणात सुरु आहे. याच दरम्यान नुकताच महाड येथे पत्रकार परिषदेत राणे याची मुख्यमंत्र्यांवर टीका कारताना जीभ घसरली. त्यामुळे महाराष्ट्रात एका नव्या वादाला सुरवात झालीय.

यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. शिवसैनिक पेटून उठले होते. राणेंविरोधात महाराष्ट्रभर आंदोलने मोर्चे निघाले. राणेंचा जाहीर निषेध शिवसैनिकांनी केला. राणेंच्या वादग्रस्त विधानानंतर २४ ऑगस्ट रोजी राज्यभर शिवसेनेकडून आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आली. यात मुंबईत जुहू येथे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये राडाही झाला.

पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला होता. यात पोलिसांच्या सर्वांत जास्त लाठ्या झेलणारा युवासेनेचा कार्यकर्ता मोहसीन शेख गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता याच मोहसीन शेखची आक्रमकता बघून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मोठे बक्षीस दिले आहे. मोहसीनची थेट युवासेनेच्या सहसचिवपदी नियुक्ती केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा