धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.

मात्र, ओशिवरा पोलिसांनी आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप रेणू शर्मा यांनी केला आहे. रेणू शर्मा यांनी पोलीस आयुक्तांच्या नावे एक पत्र लिहिलं असून त्याची प्रत राज्यपालांनाही पाठवली आहे. या पत्रात त्यांनी मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून माझी फसवणूक केली. माझ्यावर बलात्कार करून माझं शारीरिक शोषण केलं. त्यामुळे मला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा आहे, असं शर्मा यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

माझी बहीण करुणा हिच्या घरी इंदोर येथे माझी ओळख झाली. करुणा आणि मुंडे या दोघांनीही 1998 मध्ये प्रेमविवाह केला होता. मात्र 2006 मध्ये माझी बहीण बाळंत झाल्यावर इंदोरला गेली होती. त्यावेळी मी घरीच एकटी होते. हे मुंडेंना माहीत होतं. तरीही ते घरी आले आणि माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर प्रत्येक दोनतीन दिवसांनी येऊन त्यांनी माझ्याशी संबंध प्रस्तापित केले, असं रेणू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.यात त्यांनी ज्या महिलेने तक्रार केली आहे तिचे नाव करुणा शर्मा आहे. आणि त्या महिलेसोबत त्यांचे २००३ पासून संबंध होते आणि तिच्यापासून त्यांना २ मुले आहेत असेही त्यांनी लिहिले आहे. सदर महिलेने केलेले आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळले आहेत. आणि बदनामीसाठी हे सर्व केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.