InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे सुरक्षेच्या मागणीसाठी पोलिसांनी पत्र

मुंबईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या काँग्रेस आणि जनता दलाच्या(एस) बंडखोर आमदारांनी सुरक्षेच्या मागणीसाठी पोलिसांनी पत्र लिहिले आहे.

मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.

कर्नाटकातील सत्ता संघर्षाला नवीन वळण आले आहे. काँग्रेस-जनता दलाचे बंडखोर आमदार मुंबईतील पवई येथीस रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रसचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेता डीके शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्या रेनेसन्स हॉटेलमध्ये डीके शिवकुमार यांना पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply