पोलीस शिपाई चालक पदासाठी 1019 पदांची भरती

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. मात्र, या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन चांगले पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

त्यानंतर आता, राज्य सरकारकडून 1019 पोलीस शिपाई चालक पदांची पोलीस भरती काढण्यात आली आहे. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही, गृहमंत्रीही निश्चित नाही. तरीही, सरकारच्या गृहविभागाकडून 1019 पोलीस पदाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांना, आर.आर. पाटील यांच्या काळातील भरतीप्रमाणे मोठ्या भरतीची जाहिरात निघावी, अशी अपेक्षा नव्या सरकारकडून आहे.

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 डिसेंबर 2019

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/33FiQRG

अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM

कोणत्या शहरात किती जागांसाठी भरती – 

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – 156 जागा

पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – 116 जागा

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – 87 जागा

पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – 103 जागा

पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – 19 जागा

पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – 24 जागा

पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – 18 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – 27 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – 20 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – 44 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – 77 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – 41 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – 25 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – 36 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – 33 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – 6 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – 28 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – 36 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – 37 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – 34 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – 52 जागा

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा