Police Recruitment New GR | राज्यात लवकरच पोलीस भरती होणार! वाचा किती पदे झाले मंजूर
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी नवीन जी आर सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बऱ्यापैकी युवक पोलीस भरतीची तयारी करत असतात. महाराष्ट्रातील पोलीस भरती सर्वात मोठी भरती म्हणून ओळखली जाते. ज्याची लाखो उमेदवार वाट बघत असतात. याच संदर्भात शासनाने 14 ऑक्टोबर 2022 रोजी नवीन निर्णय जाहीर केले आहे.
राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे 11443 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वित्त विभाग, शासन निर्णय अन्वये पद भरतीच्या अनुषंगाने सूचना देखील देण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची भरती करणे अत्यावश्यक असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई मध्ये 11,443 पदांची भरती
राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये काही कारणास्तव रिक्त झालेली पोलिस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 11,443 पदे 100% भरण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आलेला आहे. या प्रस्तावासाठी येणारा खर्च मंजूर अनुदानातून करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | बाई समजून हलक्यात घेवू नका – सुषमा अंधारे
- Jayant Patil । ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने भष्ट्राचाराचे खोटे आरोप केले; जयंत पाटलांचा दावा
- Kirit somaiya | राजकीय नेत्यांनी अर्धवट ज्ञानाच्या आधारावर…”; मुलाच्या ‘पीएचडी’वर टीका करणाऱ्यांना किरीट सोमय्यांनी सुनावलं
- Health Care Tips | ‘या’ आयुर्वेदिक औषधी वापरून डायबिटीज वर ठेवता येऊ शकते नियंत्रण
- Viral Video | मिश्किलपणे खाऊ खाताना दिसली ‘ही’ खारुताई, पाहा व्हिडिओ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.