InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी पोलिस करणार

लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज मुंबईत तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वयाच्या ६६ व्या वर्षी ओम पुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी ओम पुरी यांच्या घराचा पंचनामा केला. प्राथमिकदृष्ट्या ओम पुरी यांच्या मृत्यू नैसर्गिक वाटत आहे. परंतु सुत्रांच्या माहितीनुसार, “पुरी यांच्या डोक्याच्या मागे दुखापत झाली आहे. ही दुखापत पडल्यामुळे झाली असेल किंवा कोणीतरी मारल्यामुळे. ओम पुरी अतिशय मद्यपान करत असंत. कालही त्यांनी मद्यपान केलं होतं. त्यांच्या घरात दारुच्या बाटल्या मिळाल्या होत्या.” यामुळे पोलीस याची कसून चौकशी करणार असल्याचं समजतं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.