InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

आजपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती बंद

सोशलमीडियात सर्वात ऍक्‍टिव असणारे प्लॅटफॉर्म म्हणून ट्‌विटरकडे पाहिले जाते. आता या ट्‌विटरवर मायक्रो ब्लॉगिंग साइटने अधिकृतपणे जागतिक स्तरावरावरील सर्व राजकीय जाहिराती स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ‘ट्विटर’चे सीईओ जॅक डॉर्सी यांनी यापूर्वी ट्विटवरून यापुढे कोणत्याही प्रकारच्या राजकीय जाहिराती स्वीकारल्या जाणार नाही अशी माहिती दिली होती. त्यानंतर या आठवड्यापासून जॅक यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तेव्हा आजपासून ट्विटर कोणताही उमेदवार, पक्ष, सरकार, अधिरकारी, नेते, राजकीय संस्था आदींकडून राजकीय जाहिराती स्वीकारणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कोणत्याही प्रकारच्या राजकीय मजकूराची जाहिराबाजी करण्याच्या संकल्पनेचे ट्विटर खंडन करत आहे. राजकीय संदेश हा जनसामान्यपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांपर्यंत पोहचायची कला कमवावी लागते, ती विकत घेऊन चालत नाही असं आम्ही मानतो, आणि याच मान्यतेवर आम्ही राजकीय जाहिराती न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विट कंपनीने शुक्रवारी केले आहे.

Loading...

‘इंटरनेटवरून जाहिरात करणे हे व्यावसायिक जाहिरातदारांसाठी अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असले तरी यामुळे राजकारणासाठी काही मोठे धोके निर्माण होतात,’ असे ट्विट सीईओ जॅक डॉर्सी यांनी 31 ऑक्‍टोबर रोजी केलं होतं. ट्विटरच्या या निर्णयामुळे आता फेसबुकसारख्या मोठ्या सोशल मीडिया साइटवर दबाव वाढला आहे.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.