‘गांजा ओढून बोलणाऱ्या राजकीय गांजाडयांना बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही’ : संजय राऊत

मुंबई : माहीममध्ये राजा बढे चौकात भाजप कार्यालयाच्या उद्घाटनच्या कार्यक्रमावेळी बोलताना नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. ”मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नसून मुंबई आमचीही आहे”, असं नितेश राणे म्हणालेत. याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे”, अशी बोचरी टीका भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली होती.

“काही लोक गांजा ओढून बोलतात असं मी कुठेतरी ऐकलं आहे. महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही”, असं ट्विट करत राऊतांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?’, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी बोचरी टीका केली.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा