Politics – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Sat, 25 May 2019 11:57:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.1 https://inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1-32x32.jpg Politics – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 148314367 राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणी समितीने फेटाळला https://inshortsmarathi.com/rahul-gandhi-resignation-rejected-by-congress-working-committee/ Sat, 25 May 2019 11:57:13 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68057

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर नवी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. पण काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव एकमताने फेटाळून लावला. काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधीच काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात, असं सांगत राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेसने फेटाळून लावला. राहुल गांधी यांनी चांगलं […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणी समितीने फेटाळला InShorts Marathi.

]]>

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर नवी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. पण काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव एकमताने फेटाळून लावला. काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधीच काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात, असं सांगत राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेसने फेटाळून लावला.

राहुल गांधी यांनी चांगलं काम केल्याची काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची भावना आहे. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी राहुल गांधीच पार पाडू शकतात, असं वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणी समितीने फेटाळला InShorts Marathi.

]]>
68057
लोकसभा निवडणुकीतील पराभवास राहुल गांधी जबाबदार नाहीत- अशोक चव्हाण https://inshortsmarathi.com/rahul-gandhi-is-not-responsible-for-the-defeat-of-the-lok-sabha-elections/ Sat, 25 May 2019 11:46:46 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68052 ashok chawan and rahul gandhi

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश आले नाही याची जबाबदारी स्विकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी या पराभवास ते जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लोकसभा निवडणुकीतील पराभवास राहुल गांधी जबाबदार नाहीत- अशोक चव्हाण InShorts Marathi.

]]>
ashok chawan and rahul gandhi

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश आले नाही याची जबाबदारी स्विकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी या पराभवास ते जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम घेतलेले आहेत, ते कुठेही कमी पडलेले नाहीत. पण ज्या-ज्या राज्यात काँग्रेसची अपेक्षित कामगिरी झालेली नाही, त्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन त्यांना नवी टीम बनवण्यासाठी मोकळीक द्यावी. महाराष्ट्रातील पराभवावर बोलताना चव्हाण म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष या नात्याने या पराभवाची सर्व जबाबदारी मी घेत आहे, त्याबद्दल कोणालाही दोष देत नाही. राज्यातील काँग्रेस पक्षात कसलेही अंतर्गत मतभेद नाहीत.आम्ही सर्वांनी एकमतांनी निर्णय घेतलेले आहेत. या पराभवाची जबाबदारी स्विकारून राजीनामा देण्यास मी तयार आहे, असेही चव्हाण म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात काँग्रेस आघाडीच्या ९ ते १० जागांवर परिणाम झाला. त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण ते आले नाहीत, त्याचा आम्हाला फटका बसला. वंचितने भाजपाची बी टीम म्हणूनच काम केले, त्याचा फायदा मात्र भाजप-शिवसेनेला झाला, असेही चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लोकसभा निवडणुकीतील पराभवास राहुल गांधी जबाबदार नाहीत- अशोक चव्हाण InShorts Marathi.

]]>
68052
5 व्यांदा खासदार झालेल्या ‘या’ महिला खासदाराची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार? https://inshortsmarathi.com/fifth-time-mp-bhawana-gawali-in-race-for-portfolio-in-modi-cabinet/ Sat, 25 May 2019 11:45:23 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68051

भावना गवळी यांनी केलेल्या विकासकामांचा सकारात्मक परिणाम म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने पुन्हा एकदा विजय मिळवला. पाचव्यांदा भावना गवळी लोकसभेवर जाणार आहेत. या निवडीनंतर भावना गवळी यांची मंत्रीमंडळाकडे आगेकूच होत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भावना गवळींची वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय. भावना गवळी यांनी काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव करून शिवसेनेचा […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. 5 व्यांदा खासदार झालेल्या ‘या’ महिला खासदाराची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार? InShorts Marathi.

]]>

भावना गवळी यांनी केलेल्या विकासकामांचा सकारात्मक परिणाम म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने पुन्हा एकदा विजय मिळवला. पाचव्यांदा भावना गवळी लोकसभेवर जाणार आहेत. या निवडीनंतर भावना गवळी यांची मंत्रीमंडळाकडे आगेकूच होत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भावना गवळींची वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय.

भावना गवळी यांनी काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव करून शिवसेनेचा हा गड कायम राखला. तर्कवितर्क आणि अफवांना पूर्णविराम देत, निकाल पूर्णपणे आपल्याकडे झुकवून भावना गवळी यांनी या मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयाची नोंद केली.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. 5 व्यांदा खासदार झालेल्या ‘या’ महिला खासदाराची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार? InShorts Marathi.

]]>
68051
राज्यात ९ महापालिका, २२ नगरपरिषदांसह ७ जिल्हा परिषद-१६ पंचायत समित्यांची २३ जूनला https://inshortsmarathi.com/by-election-mahapalika-and-nagarparishad-and-jilha-parishad-panchyat-samiti/ Sat, 25 May 2019 11:27:21 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68048

मुंबई- राज्यात २३ जून २०१९ ला ९ महानगरपालिका, २२ नगरपरिषद, ७ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समितीची पोटनिवडणूक होणार आहे. याच दिवशी (दि. २३) नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आणि मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षाचीही पोटनिवडणुकीद्वारे निवड होईल. या सर्व निवडणुकांचे निकाल २४ जून २०१९ घोषित होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यात ९ महापालिका, २२ नगरपरिषदांसह ७ जिल्हा परिषद-१६ पंचायत समित्यांची २३ जूनला InShorts Marathi.

]]>

मुंबई- राज्यात २३ जून २०१९ ला ९ महानगरपालिका, २२ नगरपरिषद, ७ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समितीची पोटनिवडणूक होणार आहे. याच दिवशी (दि. २३) नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आणि मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षाचीही पोटनिवडणुकीद्वारे निवड होईल. या सर्व निवडणुकांचे निकाल २४ जून २०१९ घोषित होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

नवनिर्मित बुटीबोरी नगरपरिषदेची होणार सार्वत्रिक निवडणूक

महानगरपालिका

पोटनिवडणूक होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महानगरपालिकांमधील १५ रिक्तपदांचा समावेश आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे ३० मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत दाखल करता येतील. २ व ५जून २०१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ जून २०१९ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १० जून २०१९ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ११ जून २०१९ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २३ मे २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: उल्हासनगर- १ब आणि ५अ, नवी मुंबई- २९, कल्याण-डोंबिवली- २६, पुणे- ४२अ, ४२ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), आणि १अ, कोल्हापूर- २८ आणि ५५, नाशिक- १० ड, मालेगाव- ६क, परभणी- ११अ आणि 3ड व चंद्रपूर- ६ब आणि १३ब.

नगर परिषद

नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील २३ रिक्तपदाच्या; तर मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान व २४ जून २०१९ रोजी मतमोजणी होईल.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे ३० मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत दाखल करता येतील. २ व ५ जून २०१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ जून २०१९ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी १३ जून २०१९ ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ जून २०१९ रोजी होईल.

नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्त जागांचा तपशील: बारामती (जि. पुणे)- ५ ब, दुधनी (सोलापूर)- २ अ, नांदगाव (नाशिक)- ७ ब, देवळा (नाशिक)- ११, श्रीरामपूर (अहमदनगर)- ९ ब, संगमनेर (अहमदनगर)- १० अ, जामखेड (अहमदनगर)- १४, दोंडाईचा-वरवाडे (धुळे)- ८ अ, सोयगाव (औरंगाबाद)- १६, अंबाजोगाई (बीड)- ४ अ, सोनपेठ (परभणी)- १ ब, मानवत (परभणी)- अध्यक्ष, हिंगोली (हिंगोली)- ११ ब, जळगाव-जामोद (बुलढाणा)- ८ अ, दारव्हा (यवतमाळ)- 2 अ, मोहाडी (भंडारा)- ४, ९ व १२, लाखांदूर (भंडारा)- १६, देवरी (गोंदिया)- ११, कोरपना (चंद्रपूर)- १५, मूल (चंद्रपूर)- ६ अ, भामरागड (गडचिरोली)- ५ आणि भामरागड (गडचिरोली)- १६.

जिल्हा परिषदा व पंचायत समिती

रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध १६ पंचायत समित्यांमधील १६ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता २३ जून २०१९ मतदान; तर २४ जून २०१९ रोजी मतमोजणी होईल.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ३ ते ८ जून २०१९ या कालावधीत स्वीकारली जातील. ५ जून २०१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.

पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).

पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील

नामनिर्देशनपत्रे सादर करणे- ३ ते ८ जून २०१९
नामनिर्देशनपत्रांची छाननी- १० जून २०१९
अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- १५ जून २०१९
अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- १९ जून २०१९
मतदानाचा दिनांक- २३ जून २०१९
मतमोजणीचा दिनांक- २४ जून २०१९

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यात ९ महापालिका, २२ नगरपरिषदांसह ७ जिल्हा परिषद-१६ पंचायत समित्यांची २३ जूनला InShorts Marathi.

]]>
68048
राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील – देवेंद्र फडणवीस https://inshortsmarathi.com/cm-devendra-fadnavis-reaction-on-rahul-gandhis-resignation-and-congress/ Sat, 25 May 2019 10:08:38 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68046

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची खिल्ली उडवली. राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या लोकसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये हाहाकार सुरु आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे राजीनामा सोपवला, मात्र तो फेटाळण्यात आला. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता, ते म्हणाले ” प्रत्येकवेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करणे योग्य असते, राहुल गांधी […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील – देवेंद्र फडणवीस InShorts Marathi.

]]>

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची खिल्ली उडवली. राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या लोकसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये हाहाकार सुरु आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे राजीनामा सोपवला, मात्र तो फेटाळण्यात आला.

त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता, ते म्हणाले ” प्रत्येकवेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करणे योग्य असते, राहुल गांधी स्वत:च स्वत:ला राजीनामा देतील. त्यांनी आत्मपरीक्षण केलंच पाहिजे. त्यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल बोलणार नाही. पण प्रत्येकवेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करणे योग्य असतं, ते त्यांनी करावं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील – देवेंद्र फडणवीस InShorts Marathi.

]]>
68046
राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणतो…. दारुबंदी उठवा https://inshortsmarathi.com/balu-dhanorkar-demands-to-lift-liquor-ban-in-chandrapur/ Sat, 25 May 2019 10:00:50 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68043

राज्यातील काँग्रेसचे एकमेव विजयी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरातील दारूंबदी हटवण्याची मागणी केली आहे. चंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे दारुबंदी हटवा, असे धानोरकर म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. धानोरकर म्हणाले की, “दारुबंदी हा विषय चुकीचाच होता. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघामध्ये 15 हजारांच्या मतांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. इथे […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणतो…. दारुबंदी उठवा InShorts Marathi.

]]>

राज्यातील काँग्रेसचे एकमेव विजयी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरातील दारूंबदी हटवण्याची मागणी केली आहे. चंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे दारुबंदी हटवा, असे धानोरकर म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

धानोरकर म्हणाले की, “दारुबंदी हा विषय चुकीचाच होता. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघामध्ये 15 हजारांच्या मतांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. इथे मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले. दारुबंदीसाठी ज्या नियम आणि अटी ठेवल्या होत्या, त्याची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु आहे. सरकारचा महसूल सुद्धा बुडालेला आहे. लोकांना तो पटणारा विषय नाही. एका जिल्हात दारुबंदी करुन काय साध्य करणार आहे. तुमच्या हातात केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश आहे. पूर्ण राज्यात दारुबंदी करायला हवी.”

धानोरकर हे महाराष्ट्रात विजयी झालेले काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणतो…. दारुबंदी उठवा InShorts Marathi.

]]>
68043
मुलाच्या पराभवानंतर नारायण राणे अमित शाहांच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना https://inshortsmarathi.com/narayan-rane-going-to-delhi-to-attend-bjp-mp-meetingam/ Sat, 25 May 2019 09:54:49 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68031

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा मुलगा माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभे होते. पण, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. पराभव जिव्हारी लागलेल्या नारायण राणे यांनी यापुढे निवडणूक लढवावी की […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुलाच्या पराभवानंतर नारायण राणे अमित शाहांच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना InShorts Marathi.

]]>

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा मुलगा माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभे होते. पण, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. पराभव जिव्हारी लागलेल्या नारायण राणे यांनी यापुढे निवडणूक लढवावी की नाही? याचा विचार करावा लागेल असं विधान केलं होतं. निकालाच्या दोन दिवसानंतर नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत.

नारायण राणे हे भाजपच्या कोट्यातील राज्यसभा खासदार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत भाजपच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये 4 वाजता ही बैठक होणार आहे. नारायण राणेंना देखील या बैठकीचं निमंत्रण आहे. त्यामुळे नारायण राणे हे या बैठकीकरता दिल्लीला रवाना झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुलाच्या पराभवानंतर नारायण राणे अमित शाहांच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना InShorts Marathi.

]]>
68031
… आणि त्याने छातीवर चाकूनं लिहिलं ‘मोदी’ https://inshortsmarathi.com/modi-fan-in-bihar-write-modi-on-his-chest-with-knife/ Sat, 25 May 2019 09:49:49 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68038

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा अभुतपुर्व विजय झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देशभरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात करण्यात आला. मात्र नरेंद्र मोदींच्या विजयानंतर बिहारमधील एका फॅनने चक्क चाकूने छातीवर मोदी असे नाव लिहिले आहे. सोनू पटेल असं नरेंद्र मोदींच्या फॅनचं नाव आहे. सोनू मोतिहारीमधील तूरकौलिया या भागात राहायाला आहे. ‘नरेंद्र मोदी भारताचं भविष्य़ असल्याचं सोनू पटेलचं म्हणणं […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. … आणि त्याने छातीवर चाकूनं लिहिलं ‘मोदी’ InShorts Marathi.

]]>

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा अभुतपुर्व विजय झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देशभरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात करण्यात आला. मात्र नरेंद्र मोदींच्या विजयानंतर बिहारमधील एका फॅनने चक्क चाकूने छातीवर मोदी असे नाव लिहिले आहे.

सोनू पटेल असं नरेंद्र मोदींच्या फॅनचं नाव आहे. सोनू मोतिहारीमधील तूरकौलिया या भागात राहायाला आहे.

‘नरेंद्र मोदी भारताचं भविष्य़ असल्याचं सोनू पटेलचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासाठा देव आहेत. जर ते देशासाठी बलिदान देऊ शकतात. तर मी देखील त्यांच्यासाठी बलिदान द्यायला तयार आहे’ असं सोनूनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. … आणि त्याने छातीवर चाकूनं लिहिलं ‘मोदी’ InShorts Marathi.

]]>
68038
संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार https://inshortsmarathi.com/record-78-women-lawmakers-elected-to-new-lok-sabha/ Sat, 25 May 2019 09:28:52 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68030

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला सर्वाधिक 352 जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधा मानावे लागले. यंदाचा निकाल अनेक अर्थाने विक्रमी ठरला आहे. यंदाच्या लोकसभेत सर्वाधिक महिला विजयी झाल्या आहे. यंदा 78 महिला खासदार संसदेत जाणार आहेत. महिला खासदारांमध्ये भाजपा, तृणमूल, बीजू जनता दल या पक्षांमधल्या महिला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. १९५२ मध्ये महिला […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार InShorts Marathi.

]]>

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला सर्वाधिक 352 जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधा मानावे लागले. यंदाचा निकाल अनेक अर्थाने विक्रमी ठरला आहे. यंदाच्या लोकसभेत सर्वाधिक महिला विजयी झाल्या आहे.

यंदा 78 महिला खासदार संसदेत जाणार आहेत. महिला खासदारांमध्ये भाजपा, तृणमूल, बीजू जनता दल या पक्षांमधल्या महिला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

१९५२ मध्ये महिला खासदार निवडून येण्याचं प्रमाण सर्वात कमी होतं. सोनिया गांधी, हेमा मालिनी, किरण खेर, साध्वी प्रज्ञासिंह या महिला खासदार विजयी झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार InShorts Marathi.

]]>
68030
राहुल गांधींकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, मात्र… https://inshortsmarathi.com/congress-president-rahul-gandhi-offers-his-resignation-at-cwc/ Sat, 25 May 2019 07:27:56 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68027

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी राजीनामा देतील अशी चर्चा सुरू होती. मात्र अनेक काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राहुल गांधींकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, मात्र… InShorts Marathi.

]]>

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही.

दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी राजीनामा देतील अशी चर्चा सुरू होती. मात्र अनेक काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे मत व्यक्त केले होते.

68027