मोदींचं कौतुक करणाऱ्या The Daily Guardian फेक वेबसाईटची पोलखोल

देशामधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विरोधकांबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर टीका करत आहे.

‘द डेेली गार्डियन’ नावाच्या वेबसाईटवर मोदींच्या कामासंदर्भातील एक लेख प्रकाशित झाला आहे. भाजपा आय़टी सेलचे प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय यांनी हा लेख शेअर केला. “कोणाच्या तरी मृत्यूची बातमी किंवा रिकव्हरी होत नसल्याच्या बातम्या दाखवल्या जातात. मात्र आपल्याला ठाऊक आहे का ८५ टक्क्यांहून अधिक लोक घरीच ठीक होत आहेत. केवळ ५ टक्के लोकांची परिस्थिती चिंताजनक असून त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मात्र देशात सध्या रिकव्हरी आणि डेथ रेटवर वाद सुरु आहे. या साथीसाठी कोणाला जबाबदार ठरवलं जावं यावर वाद सुरु आहे,” असं मालवीय यांनी म्हटलं आहे.

अनेक नेत्यांनी हे ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर या साईटसंदर्भात अनेक प्रश्न विचारले आहेत. भाजपा आय़टी सेलचे प्रमुख असणाऱ्या अमित मालविय यांच्या ट्विटवर काहींनी ही वेबसाईट दिसत का नाहीय असं विचारलं आहे. “हा द डेली गार्डीयन कुठला पेपर आहे? आमच्याकडे ओपन होत नाहीय,” असं एकाने वेबपेज ओपन होताना येणाऱ्या एररच्या स्क्रीनशॉर्टसहीत शेअर केलं आहे.

दुसऱ्या एकाने वेबसाईटच्या डोमने नेम रजिस्ट्रेशन आणि इतर माहितीच्या आधारे ‘द डेली गार्डीयन’ या वेबसाईटची नोंदणी उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आल्याचा स्क्रीनशॉर्ट शेअर केलाय. “मालवीयजी ही ‘द डेली गार्जीयन’ साईट उत्तर प्रदेशमध्ये रजिस्टर आहे. तुम्ही सारे खूप नीच पक्षाचे सदस्य आहात. इथे लोक मरत आहेत आणि तुम्हाला तुमच्या प्रतिमेची चिंता आहे. ती सुद्धा तुम्ही खोट्या वेबसाईटच्या नावाने ठीक करण्याचा प्रयत्न करत आहात,” असं शुभम शर्मा नावाच्या व्यक्तीने हा उत्तर प्रदेशमधील नोंदणीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा