Pomegranate Side Effects | डाळिंबाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Pomegranate Side Effects | टीम महाराष्ट्र देशा: डाळिंब आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, विटामिन सी आणि फायबर आढळून येते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. बहुतांश लोकांना डाळिंब खायला खूप आवडते. मात्र, डाळींबाचे अति सेवन केल्याने आरोग्याला काही दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. जास्त प्रमाणात डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला वेगवेगळ्या समस्यांना झुंज द्यावी लागू शकते. डाळिंबाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला पुढील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

लो ब्लड प्रेशर (Low blood pressure-Pomegranate Side Effects)

लो ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी डाळिंबाचे सेवन करणे टाळले पाहिजे. डाळिंबाच्या थंड प्रभावामुळे शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग कमी होतो. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी डाळिंबाचे सेवन टाळले पाहिजे. लो ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांसाठी डाळिंब घातक ठरू शकते.

खोकला (Cough-Pomegranate Side Effects)

जास्त प्रमाणात डाळिंब खाल्ल्याने खोकल्याची समस्या वाढू शकते. डाळिंबाचा प्रभाव खूप थंड असतो, त्यामुळे संसर्गही वाढण्याची शक्यता अधिक असते. सर्दी-खोकल्याची समस्या टाळण्यासाठी डाळिंबाचे नियंत्रणात सेवन केले पाहिजे.

त्वचेच्या समस्या (Skin problems-Pomegranate Side Effects)

ज्या लोकांना त्वचेशी संबंधित अलर्जी आहे, त्यांनी डाळिंबाचे अतिसेवन करणे टाळले पाहिजे. डाळिंबाचे अतिसेवन केल्याने चेहऱ्यावर लाल पुरळ येऊ शकते. त्यामुळे चेहरा खराब होऊ शकतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी डाळिंबाचे अति सेवन टाळले पाहिजे.

डाळिंबाचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला वरील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर डाळिंबाचे नियंत्रणात सेवन केल्याने त्वचेला पुढील फायदे मिळू शकतात.

त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात (Signs of skin aging are reduced-Pomegranate Benefits)

डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. दररोज एक ग्लास डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.

त्वचा चमकदार राहते (Skin remains radiant-Pomegranate Benefits)

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आढळून येते. त्यामुळे डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने किंवा डाळिंबाचा रस प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होऊ शकते. त्याचबरोबर डाळिंबाच्या मदतीने त्वचेवरील डाग देखील दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.