‘भेटली ती पुन्हा 2’ मधून पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी पुन्हा एकत्र

मुंबई : मराठी चित्रपट ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपट निर्मात्यांनी नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे . त्यामुळे अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

चित्रपटाची निर्मिती देवी सातेरी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप स्टुडिओज करणार असून गिरीश परब, आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत.

‘भेटली तू पुन्हा’ ही अतिशय हलकीफुलकी कथा असून यात वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा नैसर्गिक अभिनय या चित्रपटातून दिसला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता.

आता सिक्वेलची घोषणा झाल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या कथेनं काय नवं वळण घेतलं आहे, यात अजून काय नवीन बघायला मिळणार आहे किंवा कोणती गाणी असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा