Poonam Mahajan | “माझ्या बापाला कोणी मारलं मला माहीत आहे, मात्र मास्टरमाइंड…”, पूनम महाजनांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Poonam Mahajan | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना आग्रलेखातून भाजप पक्षावर घणाघात केला होता. यामध्ये त्यांनी महाभारताची उपमा दिली होती. यावर भाजप (BJP) खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी पलटवार केला असून त्यांनी देखील महाभारताच्या भाषेतच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी तुम्हाला शकुनी (shakuni) म्हटल्यावर इतर पक्षातील लोक मला तू हे बोलणारी कोण? असा सवाल करतील. माझ्या घराबाहेर मोठी पोस्टर लावतील. तुझ्या बापाला कोणी मारलं असा सवाल करतील. माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहीत आहे. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता? तुम्ही सत्तेत होतात. तेव्हा तुम्ही हा मास्टरमाइंड का शोधला नाही? असा सवाल पूनम महाजन यांनी केला आहे. शिवसेना-भाजप-रिपाइंच्या युतीतून मी 2014 आणि 2019मध्ये मी खासदार झाले. त्याचा मला अभिमान आहे. जनतेने विश्वास देऊन निवडून दिलं. त्याचा अभिमान मला आहे. आमच्या मित्रपक्षाला जनमताचा का अभिमान नव्हता? असा सवालही त्यांनी केला.

यादरम्यान, दोन भावात म्हणा, मित्रांमध्ये म्हणा युतीत भांडण झालं, महाभारत झालं असं तुम्ही म्हणता. हे महाभारत घडवणारे शकुनी कोण कोण होते? ते तुम्हाला माहीतच असेल. या शकुनींनी महाभारत रचलं आणि स्वत: सत्तेवर जाऊन बसले. 2019 ते 2022 दरम्यान दोन भावात महाभारत घडलं. घडलं ते घडलं, असं देखील पूनम महाजन म्हणाल्या.

दरम्यान, महाभारतात अजून एक संवाद होता. श्रीकृष्ण आणि सारथी उद्धवाचा. त्याला उद्धव गीता म्हणतात. तो उद्धव गीता म्हणूनच वाचला जातो, असं सांगत या महापालिकेच्या कुरुश्रेत्रात उतरायचंय म्हणून मी भगद्वगीता वाचली. नंतर उद्धव गीता वाचली. त्यात पहिलाच प्रश्न पडला. उद्धव म्हणतो, कृष्णा सच्चा मित्रं होण असतो. श्रीकृष्ण हसतात. उद्धवा, सच्चा मित्र तोच असतो जो गरज पडल्यावर काही न मागता देतो. तोच सच्चा मित्र असतो, असं श्रीकृष्ण सांगतात. मग उद्धव ठाकरेंनी सच्चा मित्रं म्हणून ही मैत्री का निभावली नाही? असा माझा सवाल आहे, असंही पूनम महाजन म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.