Poppy Seeds | उन्हाळ्यामध्ये नक्की करा खसखसचे सेवन, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Poppy Seeds | टीम महाराष्ट्र देशा: खसखस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. खसखसमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, फायबर, कॉपर, कॅल्शियम, आयरन इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. खसखसचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन करणे चांगले मानले जाते. उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पोट थंड राहते (Stomach remains cold-Poppy Seeds Benefits)

उन्हाळ्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते. त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये पोट दुखी, पोटात जळजळ होणे इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही खसखसचे सेवन करू शकतात. दररोज खसखस खाल्ल्याने पोट थंड राहते.

तणाव कमी होतो (Reduces stress-Poppy Seeds Benefits)

खसखसमध्ये अँटीडिप्रेसेंट गुणधर्म आढळून येतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही तणाव किंवा चिंतेमध्ये असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात खसखस समावेश केला पाहिजे. रोज रात्री झोपण्यापूर्वी खसखस खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी खसखसचे सेवन केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते (Improves digestion-Poppy Seeds Benefits)

उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना पचनाशी संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही खसखसचे सेवन करू शकतात. खसखसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. खसखस खाल्ल्याने गॅस, एसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दुधामध्ये मिसळून खसखसचे सेवन करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळतात. त्याचबरोबर या गरम वातावरणात गुलकंद खाल्ल्याने आरोग्याला खालील जबरदस्त फायदे मिळतात.

शरीर थंड राहते (The body remains cool-Gulakand Benefits)

गुलकंदाचा प्रभाव थंड मानला जातो. गुलकंदाचे नियमित सेवन केल्याने शरीर हायड्रेट आणि फ्रेश राहते. उष्णतेमुळे होणारी जळजळ शांत करण्यासाठी गुलकंद प्रभावी ठरू शकते. दररोज एक चमचा गुलकंद खाल्ल्याने थकवा, अशक्तपणा, शरीर दुखी यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Gulakand Benefits)

उन्हाळ्यात तुम्ही जर वजन कमी करायचा विचार करत असाल, तर तुम्ही दररोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केले पाहिजे. गुलकंदाचे सेवन केल्याने वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. गुलकंदाचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स राहते आणि अनेक गंभीर आजारांपासून दूर राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या