‘पोर्नोग्राफी फिल्म नाहीतर न्यूडिटी असलेल्या शॉर्ट फिल्म बनवायचो’; राज कुंद्राचा साथीदार तनवीर हाशमीचा वेगळाच दावा

मुंबई : राज कुंद्रा पोर्नोग्राफी रॅकेटमध्ये राज कुंद्रासह ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये तनवीर हाशमीचा देखील समावेश आहे. क्राईम ब्रँचच्या अधिका-यांनी रविवारी तनवीरची तीन तास कसून चौकशी केली होती व यातून अनेक मोठे खुलासे समोर आल्याची माहिती मिळाली आहे.

तनवीर राज कुंद्रासाठी काम करायचा. अर्थात राजशी त्याचे कधीही बोलणे झाले नाही. राज कुंद्राची भेटही झाली नाही. तनवीर हाशमीची रविवारी सलग तीन तास चौकशी सुरू होती. या चौकशीत तनवीरने सांगितले की ते पॉर्नोग्राफी फिल्म नाही तर न्यूडिटी असलेल्या शॉर्ट फिल्म बनवायचे. अशा फिल्मना सॉफ्ट पॉर्न म्हटले जाते. असे तनवीरने जबाबात नोंदवले आहे.

मात्र राज कुंद्रा पोर्नग्राफी प्रकरणी आत्तापर्यंत ज्यांची ज्यांची चौकशी करण्यात आली त्यांनी जबाबामध्ये ते अॅडल्ट फिल्म बनवत नव्हते असेच सांगितले आहे. तसेच राजच्या वकिल व शिल्पाने सुध्दा ते अॅडल्ट फिल्म बनवत नसल्याचा दावा केला होता.

तनवीर हाशमी सध्या जामिनावर आहे आणि त्याला राज कुंद्रा प्रकरणाबाबत चौकशीसाठी रविवारी बोलावले होते. चौकशीवेळी त्याला विचारले की राज कुंद्राला तो कधी भेटला होता का, त्यावर त्याने सांगितले की तो राज कुंद्राच्या अॅपसाठी कंन्टेट बनवायचा. परंतु तो कधीही त्याच्याथेट संपर्कात नव्हता. तनवीरने सांगितले की तो २० ते २५ मिनिटांच्या न्यूड शॉर्ट फिल्म बनवायचा. अशा फिल्मना थेट पॉर्न न म्हणता सॉफ्ट पॉर्न म्हटले जाते.

पुढे राज कुंद्राने तयार केलेल्या कंटेन्टबद्दल तनवीरने सांगितले की, असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, त्यावर बोल्ड कंटेन्ट बनवतात आणि दाखवतात. परंतु त्याबाबत भाष्य करणे योग्य नाही. याचा निर्णय कोर्टाने घेणेच योग्य ठरेल.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा