सत्ता आज आहे, उद्या नाही, सत्तेचा एवढा माज बरा नव्हे; प्रसाद लाड संतापले

हिंगोली : अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अश्वावर उभं राहून हार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजू नवले यांच्याकडून हि बाब घडल्याचं समोर आलं आहे. यानंतर राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत.

नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच नवघरेंच्या या कृतीवरुन सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. नवघरे यांच्या या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावरुन टीकेची झोड उठल्यानंतर आमदार राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

मात्र या घटनेवर अनेक राजकीय मंडळीनी आपले मत समाज माध्यमावर मांडले आहे अशातच भाजपचे प्रसाद लाड यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘यांनी जनाची मनाची दोन्ही सोडून दिलेली दिसतेय, सत्ता आज आहे, उद्या नाही सत्तेचा एवढा माज बरा नव्हे,तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात आहात हे विसरू नका असा शब्दात लाड यांनी नवघरे यांना सुनावले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा