Praful Patel | पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं स्वप्न पूर्ण झालचं पाहिजे – प्रफुल्ल पटेल
Praful Patel | मुंबई: मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
We have to work hard in 2024 elections – Praful Patel
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलत असताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel ) म्हणाले, “2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनं कंबर कसून काम केलं पाहिजे. कारण आपल्याला पवार साहेबांना (Sharad Pawar) पंतप्रधान खुर्चीवर बसवायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.” प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Release me from the post of Leader of Opposition – Ajit Pawar
या कार्यक्रमामध्ये बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले, “आमदारांच्या आग्रहामुळे मी विरोधी पक्षनेते पद स्वीकारलं होतं. मला आता विरोधी पक्षनेते पद नको. मला या जबाबदारीतून मुक्त करा.”
“मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करून संघटनेची जबाबदारी द्या. त्यानंतर मी पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा. मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली आहे. बाकी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार नेतेमंडळींना आहे”, असही ते (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | इमानदारीने देशाची सेवा करणाऱ्या मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले; विरोधी पक्षाच्या बैठकीवर चित्रा वाघांची प्रतिक्रिया
- Keshav Upadhye | हिंदुत्वाच्या विरोधातील ममता बॅनर्जी यांच्या जोडीला आदित्य ठाकरे बसणार – केशव उपाध्ये
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या ‘या’ फीचरमुळे KYC करणं झालं सोपं
- Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र – चंद्रशेखर बावनकुळे
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3parN6I
Comments are closed.