Praful Patel | शरद पवार आणि अजित पवार गेल्या 24 तासांत दोन वेळा का भेटले? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

Praful Patel | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज पुन्हा एकदा भेटले. आज (17 जुलै) अजित पवार सर्व आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवार यांच्या भेटीस गेले होते. त्यांच्या या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Our MLA had come to seek Sharad Pawar’s blessings -Praful Patel

शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. त्यांच्या या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, “काल जेव्हा शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी फक्त मंत्री उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शरद पवार आणि विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते.”

पुढे बोलताना ते (Praful Patel) म्हणाले, “काल रविवार असल्यामुळे आमच्यासोबत इतर आमदार येऊ शकले नव्हते. मात्र, आज अधिवेशन असल्यामुळे बऱ्यापैकी आमदार हजर होते.

त्यामुळे शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांची भेट घेतली आणि पक्ष एकसंघ राहावा यासाठी आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती केली. शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. मात्र, त्यांच्या मनात काय आहे याची आम्हाला कल्पना नाही.”

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार (Praful Patel) यांच्या बैठकीला शरद पवार गटाचे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. गेल्या 24 तासात शरद पवार आणि अजित पवार दोन वेळा भेटले आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43yh6su