राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी समोर हजर

इक्बाल मिर्चीशी संबंधांप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांची आज ईडी समोर हजर झाले आहेत. हजरा मेननशी केलेल्या मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारांचा आरोप त्यांच्यावर आहे. हजरा मेनन इक्बाल मिर्चीची पत्नी असून इक्बाल मिर्ची हा दाऊदचा जवळचा हस्तक आहे.

प्रफुल्ल पटेल हे ईडीसमोर हजर होण्यापूर्वीच ईडीचे अधिकारी या प्रकरणात मनी ट्रेलची करत आहेत. परदेशी खात्यांचा वापर हा मनी लॉन्ड्रिंग आणि वरळीच्या सीजे हाउस बिल्डिंग खरेदी करण्यासाठी केला गेला का याची अधिकारी करत आहेत. ऑगस्ट 2013 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इकबाल मिर्ची याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मिर्ची 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटात दाऊद इब्राहिमसह आरोपी होता.

पटेल यांच्यावर आरोप आहे की, पटेल आणि त्यांची पत्नी वर्षा यांच्याद्वारे चालवली जाणारी कंपनी मिलेनियम डेव्हलपर्सने अंडरवर्लड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इकबाल मिर्ची याच्या भूखंडावर 15 माळ्याची इमारत बांधली आहे. पण प्रफुल्ल पटेल यांनी अंडरवर्ल्डमधील कोणासोबत ही काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.