Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

Pragya Singh Thakur | भोपाळ : भाजपच्या नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.  साध्वी प्रज्ञासिंह यांनी शनिवारी भोपाळ-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच सवाल केला आहे.

Pragya Singh Thakur Controversial statement about Rahul Gandhi

“विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा देशभक्त होऊच शकत नाही. हे राहुल गांधी यांनीही ठरवलं आहे. आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही असं ते परदेशात जाऊन सांगतात. यापेक्षा लज्जास्पद काय असेल? मी राहुल गांधी यांचा निषेध करते. त्यांना देशाच्या बाहेर हाकलून दिलं पाहिजे”, असं वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं आहे.

“तुमची आई इटलीची, तुम्ही कधीच देशभक्त होऊ शकत नाही”

“तुम्ही भारताचे नाहीत हे आम्ही मान्य केलं आहे. कारण तुमची आई इटलीची आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. हे आम्ही सांगत नाही. तर चाणक्यानेच तसं लिहून ठेवलं आहे. चाणक्यांनी जे म्हटलंय तसंच राहुल गांधी वागत आहेत. इतके वर्ष तुमचं देशात सरकार होतं. तुम्ही देशाला पार पोखरून टाकलं होतं”, अशी टीकाही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केली आहे.

“परदेशात जाऊन देश, देशातील जनतेचा अपमान करताय?”

ठसंसदेत चांगलं काम सुरू आहे. सर्व काही चांगलं होत आहे. मात्र काँग्रेसचे लोक संसद चालू देत नाहीये. त्यांचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आलं आहे, त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. राहुल गांधी देशाचे नेते आहेत. तुम्हाला लोकांना निवडून दिलं आहे. तरीही तुम्ही परदेशात जाऊन देश आणि देशातील जनतेचा अपमान करत आहात?”, असा सवालही यावेळी प्रज्ञासिंह यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-