InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रज्ञा ठाकूर ही हिंदू आतंकवादाची आरोपी – स्वरा भास्कर

भाजपने अतिरेकी कारवाई आणि हत्येची आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपण काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांचा प्रचार कऱण्यासाठी भोपाळमध्ये आल्याचे सांगताना स्वरा यावेळी म्हणाली की, हिंसा, गुन्हेगारी आणि आंतकवाद पाप आहे. हे पाप कुणीही करू शकते. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यापैकी कुणीही हे पाप करू शकते. अनेकांनी असे पाप केले आहे. मात्र आतंकवादाला धर्म नसतो. परंतु, अतिरेक्याचा धर्म असतो, अस स्वराने नमूद केले.

भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवारी आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच हिंदू आतंकवादाच्या त्या आरोपी असल्याचं स्वराने म्हटले आहे.

प्रज्ञा ठाकूरला आपण हिंदू अतिरेकी समजता का, असा प्रश्न स्वरा भास्करला विचारण्यात आला. त्यावर स्वरा म्हणाली होय, प्रज्ञा ठाकूर स्वत:ला हिंदू समजत असेल आणि ती हिंदू आतंकवादाची आरोपी आहे, तर मी तिला हिंदू आतंकवादाची आरोपी मानते.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply