Prakash Ambedkar | अंधेरी पोट निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा कोणाला?, म्हणतात…

मुंबई : दोन दिवसांपुर्वीच भाकप पक्षाने ५० वर्षांची नाराजगी सोडून अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर खूप आधीच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील त्यांचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचं सांगितलं आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांना त्यांचा पाठिंबा कोणाला आहे, असं विचारण्यात आलं होतं. यावर त्यांनी उत्तर स्पष्ट केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांचं उत्तर –

आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

दिलीप लांडे यांची प्रतिक्रिया –

दरम्यान, अंधेरी पूर्व (Andheri East) विधानसभा मतदार संघातून अनेक वर्षे सेवा देणारे मुरजी काकाच शंभर टक्के निवडून येणार, असा विश्वास दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मतदार येणाऱ्या 3 तारखेला कुणाला आशीर्वाद द्यायचा, हे दाखवून देतील, असा दावा शिंदे गटातील नेते दिलीप लांडे यांनी केला आहे.

समता पक्षाने ठाकरेंना देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला आहे. समता पक्ष उद्या म्हणजेच शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे, पण त्यांना हे चिन्ह देऊ नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह दिल्यामुळे समता पक्षाच्या पाठिंब्याला फटका बसला आहे, असा दावा समता पक्षाकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.